शरद पवारांनी मित्र असणाऱ्या बाळासाहेबांना वाहिली ‘अशी’ श्रद्धांजली

टीम महराष्ट्र देशा : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज 94 वी जयंती आहे. यानिमित्त शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतीस्थळ फुलांनी सजवण्यात आलं आहे. त्यांना अभिवादन करण्यासाठी शिवसैनिक शिवाजी पार्ककडे ओढ घेत आहेत. तसंच देशभरातील दिग्गज नेत्यांकडूनही बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात येत आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी आपला मित्र असणाऱ्या बाळासाहेबांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. पवार म्हणतात,प्रत्येक मराठी माणसाने महाराष्ट्राचा स्वाभिमान मनात बाळगायला हवा, हा विचार रूजवत महाराष्ट्रीय माणसाचा हुंकार ठरलेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.. जनमानसावर पकड असलेले राजकारणी, अमोघ वक्तृतासोबतच भेदक लेखन आणि सामाजिक प्रश्नांवर वेधक भाष्य करणारे व्यंगचित्रकार असे बहुआयामी व्यक्तिमत्व स्व. बाळासाहेब ठाकरे यांना लाभले होते. तमाम मराठी जनतेच्या मनात त्यांच्यासाठी कायम अढळ स्थान राहील.

Loading...

दरम्यान, जयंतीनिमित्त बाळासाहेब ठाकरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केलं आहे. ‘महान बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन. धैर्यवान बाळासाहेबांनी लोकांच्या प्रश्नांना आवाज देताना कधीही मागे-पुढे पाहिले नाही. भारतीय मुल्यांबद्दल त्यांना नेहमीच अभिमान होता. ते लाखो लोकांना प्रेरणा देत राहतील,’ अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

याचप्रमाणे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरवरुन बाळासाहेबांना अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी जाऊन सकाळी आठ वाजताच मानवंदना दिली.

तसेच ‘कठोर अन् प्रेमळ. प्रेरणादायी अन् उर्जावान. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सदैव मार्गदर्शन करीत राहतील.’ असं ट्वीट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ‘महाराष्ट्राचं वैभव, ज्वलंत विचारांचा ‘मार्मिक’ ठेवा, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन.!’ असं दुसरं ट्वीटही पाठोपाठ फडणवीसांनी केलं आहे.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
'पुन्हा निवडणुका झाल्यास भाजपाच्या आमदारांची संख्या १०५ वरुन पंधरावर येईल'
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
परळीतील 'त्या' प्रकरणातील आरोपींना अटक, कोणाचीही गय केली जाणार नाही - धनंजय मुंडे
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
राजकीय भूकंपाची शक्यता ; भाजपच्या २५ नाराज आमदारांची बैठक
‘सामना’मध्ये छापून आलेल्या नाणार प्रकल्पाच्या जाहिरातीवर मुख्यमंत्री ठाकरेंनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले...