शरद पवारांनी उदयनराजेंना घेतलं गाडीत ; शिवेंद्रराजेंनी केलं गाडीचे सारथ्य

टीम महाराष्ट्र देशा -साताऱ्यातील उदयनराजे आणि शिवेंद्रराजे या दोन्ही राजांच्या मनोमिलनाच्या चांगल्याच सध्या चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. त्यातच आता या सर्व चर्चांना पृष्ठी देणारी आणखी एक घटना समोर आली आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजेंना भोसले यांना घेऊन एकाच कारने प्रवास केला आहे . यामध्ये शिवेंद्रराजे यांनी स्वतः गाडी चालवत होते. शरद पवार साताऱ्यात हे यशवंत हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी आले होते. त्यावेळी हा प्रकार घडला आहे.

खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजेंना भोसले या दोघांचे वैर अख्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून उदयनराजे आणि शिवेंद्रराजे हे एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे दोन्ही सामर्थकामध्ये कमालीचा उत्साह पहावयास मिळत आहे. शरद पवार यांच्या सोबत दोन्ही राजेंनी एकाच गाडीने प्रवास केल्याने या प्रकाराची चांगलीच चर्चा रंगली आहे.