मुंबई : करोना संक्रमणाचा देशभर होणारा फैलाव चिंतेत अधिक भर टाकतोय. आज सकाळी समोर आलेली करोनाची आकडेवारी धोक्याची घंटा ठरतेय. देशात गेल्या २४ तासांत १ लाख १५ हजारांच्या घरात नवीन करोना संक्रमित रुग्ण आढळले आहेत.
या पार्श्वभूमीवर लसीकरण मोहिमेला गती दिली जात आहे. अनेक नेते स्वतः पुढे येत लसीकरण करवून घेत आहेत.यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी आज कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला. दि. १ मार्च रोजी शरद पवार यांनी लशीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर एक महिन्याने त्यांनी दुसरा डोस घेतला आहे.
योगायोग म्हणजे आज जागतिक आरोग्य दिन आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या नियमानुसार प्रत्येकाने आपापले लसीकरण पूर्ण करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. जे.जे. रुग्णालयाच्या परिचारिका श्रद्धा मोरे यांनी लस दिल्याबद्दल साहेबांनी त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने व वैद्यकीय पथक उपस्थित होते.
आज सकाळी कोविड-१९ लसीकरणाचा दुसरा डोस घेतला. डॉ. लहाने व त्यांच्या वैद्यकीय पथकाचे तसेच दोन्ही डोस कौशल्याने देणाऱ्या परिचारिका श्रीमती श्रद्धा मोरे यांचे मनापासून आभार! pic.twitter.com/pxnvZEZskB
— Sharad Pawar (@PawarSpeaks) April 7, 2021
दरम्यान, कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असून आत्तापर्यंत 80 लाखांहून अधिक नागरिकांचं लसीकरण झालं आहे. मात्र, राज्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता लसीकरणाला अधिक वेग येण्यासाठी केंद्र शासनाकडून लसींचा अधिकाधिक पुरवठा व्हावा यासाठी पाठपुरावा करावा, अशा सूचना राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काल दिल्या आहेत. कोरोना लसीकरणासंदर्भात नियोजन आणि समन्वयासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली काल राज्य सुकाणू समितीची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.
महत्वाच्या बातम्या
- रेमडेसिवीरचा काळाबाजार होणार नाही याची खबरदारी घ्या – एकनाथ शिंदे
- कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेवून अरविंद केजरीवाल सरकारने उचलली ‘ही’ पावलं
- सीसीसी बेडचे ऑक्सीजन बेडमध्ये रुपांतर करण्याचे पूर्वनियोजन करा, वडेट्टीवारांच्या सूचना
- ‘मिनी लॉकडाऊनच्या नावाखाली जनतेची फसवणूक करुन सरकारने लॉकडाऊन लावला’
- पृथ्वी शॉ कडून पाँटिंगची प्रशंसा; ‘चक दे’ मधील शाहरुखशी केली तुलना