fbpx

‘…अन शरद पवारांनी जाहीर कार्यक्रमात घेतला उखाणा’

टीम महाराष्ट्र देशा – ‘नावाची काय बिशाद, प्रतिभा माझ्या खिशात’ हा उखाणा घेत शरद पवारांनी सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. इंदापुरातल्या एका महिलांसाठीच्या कार्यक्रमात त्यांनी हा उखाणा घेतला आहे.

राजकारणाच्या पलीकडे जाऊन असं एक क्षेत्र नसेल जिथे शरद पवारांचा वावर नसेल. इंदापूर बाजार समितीच्या वतीने शरद कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पवारांनी उखाणा स्पर्धेबद्दल विचारणा करत , निवेदिकेलाच उखाणा घ्यायला सांगितला.

त्यावेळी निवेदिकेने लांबलचक उखाणा घ्याला सुरुवात केली. त्यावर पवार म्हणाले, पटकन उखाणा घ्या अस पवार म्हणाले आणि व्यासपीठावरील उपस्थित नेत्यांना उखाणा घेताय का अशी विचारणा केली. त्यावर एका एका कार्यकर्त्याने उत्साहात उखाणाही घेतला.

पवारांनी त्यानंतर उखाणा कसा सोप्या आणि सरळ भाषेत असावा असं म्हणत ‘नावाची काय बिशाद ; प्रतिभा माझ्या खिशात’ असं हातवारे करत उखाणा घेतला आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकवला.

त्यांच्याबरोबर सुप्रिया सुळे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. शरद पवारांनी घेतलेल्या उखाण्यावर सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवून दाद दिली आणि हा उखाणा रेकॉर्ड करू नका नाहीतर आज बाबांना घराबाहेर झोपावं लागेल, असंही मिश्किलपणे म्हणाल्या.