उदयनराजे की श्रीनिवास पाटील,साताऱ्याचा उमेदवार आज पवार ठरणार

टीम महाराष्ट्र देशा- लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीवादीतर्फे मतदारसंघनिहाय आढावा बैठक सुरु आहे. साताऱ्याचे खासदार उदयनराजे यांच्याविषयी काय निर्णय होणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. सातारा लोकसभा निवडणुकांसाठी खासदार उदयनराजे भोसले यांना पर्याय देण्यासाठी पुन्हा श्रीनिवास पाटलांशी गुफ्तगु सुरु झाल्याने पवारांची साताऱ्यासाठी राजकीय चाचपणी सुरू असल्याचे स्पष्ट झाले.

नुकत्याच झालेल्या रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवासाठी शरद पवार साताऱ्यात येणार होते. यावेळी पुण्यातून येताना आपल्या गाडीतून त्यांनी श्रीनिवास पाटील यांनाही सोबत आणले होते. बारामती होस्टेल ते सातारा आणि वायसी कॉलेज वरून थेट कर्मवीर समाधी परिसरात दोन्ही मित्र एकदमच दाखल झाल्याने पवारांची राजकीय गणिते जाणकारांच्या लक्षात आली.

तर दुसऱ्या बाजूला बारामतीच्या गोविंद बागेत राष्ट्रवादी सुप्रीमो शरद पवार यांच्या निवासस्थानी साताऱ्याच्या खासदारकीची गोपनीय खलबते सोमवारी रंगली होती .खासदार उदयनराजे सोडून इतर कोणताही उमेदवार पक्षाने द्यावा, आम्ही त्याला निवडून आणतो, अशी मागणी साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांनी शरद पवार यांच्याकडे केल्याने उदयनराजे व आमदार यांच्यातील टोकाचा आंतरविरोध पुन्हा ऐरणीवर आला होता.

रामराजे नाईक निंबाळकर, शिवेंद्रराजे भोसले, शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादीचे साता-यातील प्रमुख नेते आहेत. पण या नेत्यांना उदयनराजे जुमानत नाहीत. या सगळ्याच नेत्यांशी उदयनराजे यांच्याशी असलेले मतभेद सतत चव्हाट्यावर येत असतात.त्यामुळे आजच्या बैठकीत काय होतं, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.

फलटणकरांच्या बांडगुळपणामुळे नको त्यांचं फावलंय : खा. उदयनराजे

‘जब तक है गणपती तब तक बजेगी डॉल्बी’ – उदयनराजे भोसले

कोणाच्या जाण्याने पक्ष संपत नसतो, तारिक अन्वर यांना टोला प्रफुल्ल पटेल यांचा टोला

You might also like
Comments
Loading...