शरद पवार होणार निवृत्त ? पुन्हा राज्यसभेबाबत सस्पेन्स कायम

टीम महाराष्ट्र देशा – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा राज्यसभेतील कार्यकाल येत्या २ एप्रिल रोजी संपणार आहे. पवार आणि इतर ६ सदस्य राज्यसभेतून निवृत्त होणार असल्याने राज्यातून सात जागा रिक्त हिणार आहे.

राज्यातील विधानसभेतील संख्याबळ पाहता महाविकास आघाडीचे ७ पैकी ४-५ सदस्य निवडून येऊ शकतात . तर भाजपचे स्वबळावर २ तर इतरांच्या मदतीने तिसरा उम्मेद्वार निवडून येऊ शकतो.

Loading...

२ एप्रिल पूर्वी नवीन सदस्यांची निवड होणे अपेक्षित आहे. निवडणूक आयोग लवकरच याबाबतचा कार्यक्रम घोषित करेल अशी अपेक्षा आहे. परंतु अजूनही महाविकास आघाडीचे जागांचे वाटप आणि उम्मेद्वारांची यादी झालेली नाही.

आघाडी आणि भाजप दोन्ही कडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. शरद पवार यांचे नाव निश्चित मानले जात असले तरी याबाबत पक्षाने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

दुसरीकडे भाजपकडून उदयनराजे भोसले यांच्या राज्यातील आणि केंद्रातील भाजप नेत्यांशी बैठका सुरु असून त्यानाही अजून पक्षाकडून ग्रीन सिग्नल मिळाल्याची ठोस माहिती नाही.

हेही पहा –

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट, पवार म्हणतात ‘ते’ दाखवण्याची गरज आहे का ?
'१४ एप्रिलनंतर महानगरं आणि बाधित जिल्हे वगळून ग्रामीण भागातील लॉक डाऊन उठवावे'
आमदार साहेब गोरगरिबांच्या अन्नात माती कालवू नका, राष्ट्रवादी-शिवसेनेतील वाद आला चव्हाट्यावर
संतापजनक : तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना माझा सलाम ; या दिग्गज कलाकाराने केलं कौतुक
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका