शरद पवार घेणार मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, ‘या’ महत्वपूर्ण विषयावर होणार चर्चा

blank

टीम महारष्ट्र देशा : राज्यात आता निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे अनेक नेत्यांची भेटी गाठी साठी , सभा-चर्चांसाठी धावपळ होताना दिसत आहे. अशातच कोल्हापूर – सांगलीला आलेला महापूर हा राजकीय मुद्दा ठरला आहे. हाच मुद्दा घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. 20 तारखेला मुंबईत मुख्यमंत्री आणि शरद पवार यांची ही महत्वपूर्ण बैठक होणार आहे.

अतिवृष्टीमुळे कोल्हापूर सांगलीला आलेला महापूर हा भयंकर होता. या महापुरात नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नागरिक अन्न, वस्त्र , निवारा या मुलभूत गरजांपासून वंचित आहेत. नागरिकांना आर्थिक फटका बसलाचं आहे. त्यात आता महापुरामुळे रोगराई पसरू लागली आहे. या हलाखीच्या परिस्थितीत पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे प्रशासनाने देखील ठोस उपाययोजना कराव्यात आणि त्या प्रत्यक्षात अमलात आणाव्यात यासाठी शरद पवार मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार आहेत.

पूरग्रस्तांना मदत करण्यासंदर्भात तसेच पुनर्वसन करण्यासंदर्भात काही मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात येणार आहे. दरम्यान, पूरग्रस्तांचं पुनर्वसन कशा पद्धतीने करायचं आणि त्या करताना नेमक्या कोणकोणत्या गोष्टी अपेक्षित आहे. हे पवार मुख्यमंत्र्यांना सांगणार असल्याची चर्चा आहे.या बैठकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह कोल्हापूर आणि सांगलीमधील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहे.