fbpx

शरद पवार आजोबांकडून तीन नातू गिरवतायेत राजकारणाचे धडे

टीम महाराष्ट्र देशा – शरद पवार नुकतेच तीन दिवस कोकण दौऱ्यावर होते. पण पवारच्या या दौऱ्यात चर्चा मात्र होती. पवारांच्या तीन नातवांची. पार्थ अजित पवार, रोहित राजेंद्र पवार आणि युगेंद्र श्रीनिवास पवार. शरद पवार यांच्या कोकण दौऱ्यात हि तीन नातवंडे कायम सोबत दिसली. जणू काही ते आजोबांकडून राजकारणाचे धडे गिरवतायेत.

सध्या रोहित पवार जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यांच्या आमदारकीच्या चर्चा नेहमी रंगत असतात. पार्थ पवार यांचही नाव अधून मधून लोकसभेसाठी चर्चेत येत असते. त्यामुळे पवार घराण्याही चौथी पिढी आता राजकारणात सक्रीय होणार अशी शक्यता नाकारता येत नाही आणि त्यासाठी ते आजोबांकडून राजकारणाचे धडे घेतायेत असही म्हणता येईल.

‘माधुरीला उमेदवारी द्यावी इतके वाईट दिवस भाजपवर आले नाहीत : संजय काकडे