ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सरकारची मदत अपुरीच – शरद पवार

narendra modi with sharad pawar

टीम महाराष्ट्र देशा : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आता ऊसावर सबसिडी मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने ऊसाला प्रतिटन 55 रुपयांची सबसिडी देण्यास मंजुरी दिली आहे. साखरेचे दर घटल्यामुळे ऊस उत्पादक अडचणीत आले होते. मात्र साखरेबाबत केंद्राने जाहीर केलेली मदत अपुरी आहे, असे माजी कृषिमंत्री शरद पवार म्हणाले. तसेच, नितीन गडकरींशी यासंदर्भात चर्चा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीची वेळ मागितली असून, येत्या आठ ते दहा दिवसात भेटून यावर चर्चा करणार असल्याचेही पवार म्हणाले आहेत.

केंद्रीय मंत्रिगटाने 55 रुपये प्रति टन अनुदान देण्याची शिफारस केली. त्यानुसार देशातील शेतकऱ्यांना 1500 ते 1600 कोटी रुपये मिळणार आहेत. आज अखेर महाराष्ट्रात साडे नऊशे लाख टन ऊसाचं गाळप झालं आहे, त्यानुसार महाराष्ट्राच्या वाट्याला 522 कोटी रुपये येतील. विशेष म्हणजे हे अनुदान हे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात देण्याचा विचार चालू आहे. याआधी 2015-16 मध्ये ऊसावर सबसिडी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. त्यावेळी एका टन ऊसावर 45 रुपये इतकी सबसिडी केंद्र सरकारने मंजूर केली होती.