बाबासाहेबांच्या भूमीत संविधान वाचवण्याचे अभियान राबवण्याची वेळ आली आहे

टीम महाराष्ट्र देशा : भारतरत्न डॉ. आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाची शपथ घेऊन पदावर विराजमान होणारे नेते आता संविधान बदलण्याची भाषा करीत आहेत. संविधान बदलण्याचे भाजपाचे हे षड्यंत्र सर्वांनी मिळून हाणून पाडणे गरजेचे आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केले.

कोकण विभागातील संविधान बचाव अभियानाची सांगता रायगड जिल्ह्यातील रोहा येथे झाली, त्या प्रसंगी मार्गदर्शन करताना पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समानतेच्या न्यायाचा हुंकार दिला होता. पण भाजपा सरकारमुळे त्याच पवित्र भूमीत संविधान वाचवण्याचे अभियान राबवण्याची वेळ आली आहे. देशाची सूत्रे ज्यांच्या हातामध्ये आहेत, त्यांचा संविधानावर विश्वास नाही, तेच आता घटना बदलण्याची भाषा करीत आहेत त्यामुळे एकजुटीने भाजपाचे मनसुबे उधळून लावावेत, असे आवाहन पवार यांनी केले.

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राम मंदिराचा मुद्दा काढला जात आहे : पवार