घटनेत बदल करुन मराठा समाजाला आरक्षण द्या : शरद पवार

कोल्हापूर : काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले होते. मात्र, कोर्टाने ते आरक्षण रद्द केले. आता, राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे सरकारने घटनेत बदल करुन मराठा समाजाला आरक्षण द्यावं, त्यासाठी विरोधकांशी मी बोलेन आणि माझ्या पक्षाचा संपूर्ण पाठिंबा राहिल, असे शरद पवार यांनी कोल्हापुरात बोलताना म्हटले.

Loading...

दरम्यान,आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, एमआयएम या पक्षाचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होणार आहेत. मराठा आरक्षणावर या सगळ्यांची काय भूमिका आहे हे जाणून घेतले जाणार आहे. तसेच या बैठकीत या प्रश्नावर काय तोडगा काढता येईल याचीही चर्चा केली जाणार आहे.

नेमकं काय म्हणाले शरद पवार ?

काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला. पण कोर्टात तो निर्णय रद्द झाला, तोपर्यंत आचारसंहिता लागली. त्यानंतर, भाजपचे सरकार आले. या सरकारनेही धनगर व मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल, असे अभिवचन दिले होते. ते आपले वचन पूर्ण करतील असे वाटत होते. पण तरुणांना काहीही न मिळाल्यामुळेच हे आंदोलन पेटले. केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे. त्यांनी घटनेत किरकोळ बदल करून आरक्षणाचा निर्णय घ्यावा. याबाबत मी विरोधकाशी बोलेन, त्याला आमच्या पक्षाचाही पाठिंबा असेल, असेही पवार यांनी म्हटले.

‘एक मराठा लाख मराठाच्या घोषणा’ पुणे महापालिका सभागृहात

…. तर सरकार तातडीने विचार करेल : नारायण राणेLoading…


Loading…

Loading...