पुरोगामी विचारांच्या लोकांना नक्षलवादी ठरवलं जात आहे : शरद पवार

पुणे : भाजपकडून सत्तेचा गैरवापर होत असून,पुरोगामी विचारांच्या लोकांनी एकत्र येऊन पुण्यात एल्गार परिषद भरवली तर सरकार त्यांना नक्षलवादी म्हणून जेलमध्ये टाकत आहे. भीमा कोरेगाव चा उद्योग कोणी केला हे सर्वाना माहित आहे मात्र या प्रकरणात ज्यांचा काहीही संबंध नाही अश्या लोकांना अटक केली जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आज आपला २० वा वर्धापन दिन होता. जेष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यासह अनेक दिग्गज नेते सभेला संबोधित करणार असल्याने आजच्या सभेला विशेष महत्व प्राप्त झालं होतं. सहकारनगर भागात असणाऱ्या शिंदे हायस्कूलच्या मैदानात ही सभा पार पडली

शरद पवार यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

  • यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यक्रमात पगडी द्यायचीच असेल तर महात्मा फुलेंची द्यावी : शरद पवार
  • महाराष्ट्र सदनाची निर्मिती छगन भुजबळांमुळे झाली. त्यामुळे भुजबळांच्या कार्याची पावती मिळते : शरद पवार
  • विविध पक्षांतील नेत्यांना सगळ्यांना एकत्र येण्याची मानसिकता आहे : शरद पवार
  • महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांनी 35 हजार कोटींचे कर्ज माफ केल्याचे सांगितले. मात्र, ते काही झाले नाही : शरद पवार
  • पेट्रोल-डिझेल एक रुपयाने कमी करायचे आणि गॅसचे दर वाढवायचे : शरद पवार
  • मतदानाबद्दल मतदारांच्या मनात आधी शंका नव्हती, आता मनात शंका निर्माण होत आहेत: शरद पवार
  • राज्य सरकारने घोषित केलेल्या कर्जमाफीत अजूनही ५० टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; शरद पवार
  • भीमा कोरेगाव मध्ये कोणी उद्योग केला हे सगळ्या जगाला माहीत मात्र सबंध नाही त्याला अटक करता : शरद पवार