शरद पवार यांचा मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

sharad-pawar

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. शनिवारी झालेल्या व्यवस्थापकीय समितीच्या बैठकीत शरद पवार यांनी एमसीएच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. शरद पवारांनी व्यवस्थापकीय समितीकडे राजीनामा दिला.

लोढा समितीच्या शिफारशींनुसार शरद पवार एमसीएचे अध्यक्ष भुषविण्यास अपात्र ठरतात. लोढा समितीने सुचविलेल्या शिफारशी आणि त्यावर सुप्रीम कोर्टाने घेतलेली भूमिका यावर चर्चा करण्यासाठी मुंबईत आज एमसीएच्या व्यवस्थापकीय समितीची बैठक झाली. बैठकीत शरद पवार यांनी आपण अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे पत्रक व्यवस्थापकीय समितीकडे सुपूर्द केले.

लोढा समितीच्या शिफारशींनुसार क्रिकेट संघटनेचा पदाधिकारी ७० वर्षांपेक्षा कमी वयाचा असावा आणि एका पदाधिकाऱयाला जास्तीत जास्त दोन टर्मपेक्षा अधिक कालावधीसाठी पदाधिकारी होता येणार नाही. शरद पवार यांचे वय ७६ वर्ष असून ते याआधी दोनवेळा त्यांनी एमसीएचे अध्यक्षपद भुषविले आहे. शरद पवार यांनी सुप्रीम कोर्टाच्या भूमिकेचा मान राखून अध्यक्षपदाचा राजीनामा व्यवस्थापकीय समितीकडे सुपूर्द केला असून त्यावर कोणता निर्णय घेता येईल याचा विचार करावा लागेल, असे एमसीएचे अतिरिक्त सचिव व्ही.पी.शेट्टी यांनी सांगितले.

blank