राम मंदिरासाठी घरे उद्ध्वस्त का करता? शरद पवार

टीम महाराष्ट्र देशा –  रामाच्या नावाने मंदिर बांधायचे, त्यासाठी आजूबाजूच्या लोकांची घरे उद्ध्वस्त करून रामाला जसा वनवास भोगाला लागला तसा वनवास तेथील लोकांना भोगावा लावायचा आणि रामाबद्दलचे प्रेम दाखवायचे हे काही योग्य नसल्याचे म्हणत सरकारवर निशाणा साधला आहे.

शरद पवार यांच्या उपस्थितीत कोकण विभागातील संविधान बचाव अभियानाची सांगता रायगड जिल्ह्यातील रोहा येथे झाली, त्या प्रसंगी मार्गदर्शन करताना पवार बोलत होते. राम मंदिराच्या मुद्द्यावर आयोध्येमधील एक शिष्टमंडळ भेटले. त्यांनी सांगितले राम मंदिराचे काम सुरू होणार आहे. मंदिराला आमचा विरोध नसल्याचे शिष्टमंडळाने सांगितले; परंतु मंदिर परिसरातील सुमारे अर्धा किलोमीटर परिघातील इमारती पाडून तेथे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.रामाच्या नावाने मंदिर बांधायचे, त्यासाठी आजूबाजूच्या लोकांची घरे उद्ध्वस्त करून रामाला जसा वनवास भोगाला लागला तसा वनवास तेथील लोकांना भोगावा लावायचा आणि रामाबद्दलचे प्रेम दाखवायचे हे काही योग्य नसल्याचे ही पवार यांनी स्पष्ट केले.