राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात अन्याय होतोय हे राजेंना आधी कळलं नाही का ? : शरद पवार

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक आमदार आणि खासदारांनी भाजप सेनेत प्रवेश केला आहे. तसेच आता खासदार उदयनराजे भोसले यांनी पक्षाला सोडचिट्ठी देत भाजप मध्ये प्रवेश केला आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी राज्य दौऱ्याचे नियोजन करून प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार ते आज नाशिक येथे आले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

उदयनराजे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात अन्याय होत असल्याच कारण सांगून भाजपात प्रवेश केला. याबाबत शरद पवार म्हणाले की, उदयन राजेंना समज येण्यास 15 वर्ष लागले. पक्षात अन्याय होतोय अस उदयनराजे यांना आधी कळलं नाही का ? असा सवाल पवारांनी यावेळी उपस्थित केला. तसेच आगामी विधनसभा निवडणूक कॉंग्रेस , राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शेकाप अशी आघाडी करून एकत्रित निवडणुक लढवणार आहोत. मात्र कॉंग्रेस आघाडीत राज ठाकरे यांच्या मनसेला जागा नसल्याचं, शरद पवार यांनी यावेळी सांगितल.

Loading...

दरम्यान शरद पवार आज नाशिक येत असले तरी छगन भुजबळांसह राष्ट्रवादीच्या निम्म्याहून अधिक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या स्वागताकडे पाठ फिरवली असल्याची चर्चा होती. मात्र छगन भुजबळांनीचं आजचा कार्यक्रम आखून दिला असल्याचं शरद पवार म्हणाले. तसेच या विधानसभेला काँग्रेस – राष्ट्रवादीमध्ये 125 – 125 मित्रपक्षांना 38 जागा असा फॉर्म्युला ठरला आहे. त्यामुळे जागा वाटप होताच नाशिक , मुंबई , नागपूरमध्ये सभा घेणार असल्याच, पवार यांनी यावेळी सांगितले. येत्या आठवड्याभरात निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील, असा अंदाजही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
म्हणून नारायण राणे यांचा जळफळाट होतोय, शिवसेनेचा ढाण्या वाघ राणेंवर गरजला
टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
शरद पवार होणार निवृत्त ? पुन्हा राज्यसभेबाबत सस्पेन्स कायम
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
अर्जुन कपूरचा मलायका सोबतच्या नात्याबद्दल बोलतांना मोठा खुलासा ...
चुकीला माफी नाही ! आदित्य ठाकरे यांनी केले दिल्लीतील 'त्या' अधिकाऱ्याला निलंबित
'तृप्ती देसाईंवर अश्लील टीका इंदुरीकरांच्या सूचनेनुसारच' ; तासगावात तक्रार