… हा पर्याय राष्ट्रवादी काँग्रेस असेल तर त्यासाठी आम्ही तयार- शरद पवार

टीम महाराष्ट्र देशा: शरद पवार यांनी विदर्भ दौऱ्यादरम्यान एक मोठ विधान केलय. शरद पवार म्हणाले आहेत की, “या दौर्यातून एक गोष्ट लक्षात आली. लोकांना सध्याच्या राज्यकर्त्यांबाबत विश्वास राहिलेला नाही. त्यांना पर्याय हवा आहे. हा पर्याय राष्ट्रवादी काँग्रेस आहे, असे लोकांना वाटत असेल तर आम्ही त्यासाठी पूर्णपणे तयार आहोत”.

शरद पवार यांनी नुकताच विदर्भाचा दौरा केलाय. या दौऱ्यादरम्यान शरद पवार यांनी सरकारच्या एकूण कारभारावर सडकून टिका तर केलीच पण त्याबरोबर लोकांच्या समस्या सुद्धा जाणून घेतल्या, त्यात शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन संवाद असो किंवा जनतेत जाऊन त्यांच्या समस्या समजून घेणे असो अशा अनेक अर्थाने शरद पवार यांचा हा विदर्भ दौरा चर्चेचा विषय ठरला.