नागपूर: आज गुजरात निवडणुकांत तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या प्रामाणिकतेवर प्रश्न उभा केला जातो. त्यांनी गुजरातची सत्ता उलटून टाकण्यासाठी पाकिस्तानशी हाथ मिळवणी केल्याची भाषा बोलली जाते. मात्र ज्या व्यक्तीच्या प्रमानिकतेवर संपूर्ण भारताला विश्वास अशा व्यक्तीवर पाकिस्तान सोबत हातमिळवणी केल्याचा आरोप केला जातो हे अत्यंत चुकीच असल्याच म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. नागपूरमध्ये आयोजित विरोधी पक्षांच्या संयुक्तिक आंदोलनात ते बोलत होते.
शरद पवार यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
राज्य आणि केंद्र सरकारने सत्तेवर येताना कर्जमाफी देणार असल्याच आश्वासन दिले, साडेतीन वर्षे झाले तरी काहीच हालचाल नाही.
विदर्भातील शेतकऱ्याच्या आत्महत्या कळल्यावर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह आणि आम्ही यवतमाळ विदर्भ दौरा केला, ऐतिहासिक ७० हजार कोटींची कर्जमाफी दिली
यापुढे राज्य सरकार तुमच्या खात्यामध्ये कर्जमाफीची सर्व रक्कम देण्याची आश्वासन देत असेल, तरच ठीक अन्यथा यापुढे कोणतीही थकीत देणी देणार नसल्याचा आता निर्धार करावा लागेल.
गावागावात जाऊन सांगा आता कोणती देणी देयाची नाहीत
तुम्ही काय दिवे लावले हे मुख्यमंत्री विचारतात, त्यांनी आजचे पेपर वाचावेत जगातील मान्यवर संस्थांनी आमच्या कामाची दाखल घेतली आहे
मुख्यमंत्र्यांनी दमदाटीची भूमिका घेतली आहे. तुम्हाला उलथून टाकण्याची ताकत बबळीराजात आहे.
आता परिवर्तन होईपर्यंत थांबायचं नाही
https://youtu.be/Y2VPyU9ogK4