देशाच्या पंतप्रधानांना मारण्याचा डाव होता, असे म्हणणे हास्यास्पद

मुंबई : ‘ भीमा-कोरेगाव आणि एल्गार परिषदेच्या प्रकरणानंतर देशाच्या पंतप्रधानांना मारण्याचा डाव होता, असे सांगणे हास्यस्पद आहे.असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. राज्यात सध्या भीमा कोरेगाव प्रकरणाचा वादावरून अनेक उलट सुलट चर्चा होताना दिसत आहेत. अशातच शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत या सर्व घटनाक्रमवार भाष्य केले आहे.

तसेच संपूर्ण देशाची निवडणूक घ्या, आम्ही तयार आहोत, असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले. यावेळी बोलताना पवार म्हणाले, ‘कोरेगाव भीमा या ठिकाणी स्तंभाला मोठ्या प्रमाणावर मानवंदना देण्यास लोक येतात. डॉ. बासाहेब आंबेडकर यांनीही अनेकदा या ठिकाणाला भेट दिली आहे. या ठिकाणी पेशव्याचा पराभव केला गेला हा इतिहास आहे. आतापर्यंत स्थानिक लोक ही मदत करत होते. कधीही कटुता पाहायला मिळाली नाही. मात्र, भिडे आणि एकबोटे यांनी एक वेगळं वातावरण निर्माण करण्याच काम त्या ठिकाणी केलं.

Loading...

ते पुढे म्हणाले, कोरेगाव भीमा आणि एल्गार परिषद याचा काही ही संबध नव्हता. एल्गारच्या दोन ते तीन दिवस आधी हा कार्यक्रम झाला होता. पोलिसांचा रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. त्यात कोण काय बोललं हे आहे. मात्र त्या ठिकाणी जे नव्हते त्यांच्यावर ही खटले भरले आहेत. एनपीआर’ला आम्ही संसदेत विरोध केला आहे. इथे आघाडी सरकार आहे. काही मुद्द्यांवर वेगळं मत असलं तरी त्याचा सरकारवर परिणाम होत नाही,” असेही पवार म्हणाले.

दरम्यान, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शरद पवारांची त्यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी भेट घेतली. या बैठकीत एल्गार परिषद, कोरेगाव भीमा तपास, एनआयए या मुद्यांवर चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश
परभणीच्या 'त्या' शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांनाच केला एसएमएस, त्यांनतर जे घडले...
भारताचा 'हा' स्टार गोलंदाज पोलिसी वर्दीत करतोय कोरोनाबाबत जनजागृती
आनंदवार्ता : पुण्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या वाढली, डॉक्टरांवर होतोय कौतुकाचा वर्षाव
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
अभिनेते ऋषी कपूर यांची मागणी, 'संध्याकाळपुरते तरी दारुची दुकानं उघडा...'
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
देशातील 10 बँकांचे होणार विलीनीकरण, १ एप्रिलपासून प्रक्रियेला होणार सुरवात
फैसला ऑन दि स्पॉट , संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दादांनी दिला दिलासा
एकही केस नसणाऱ्या आदित्य ठाकरेंना झेड दर्जाची सुरक्षा कशाला ? : निलेश राणे