टीम महाराष्ट्र देशा: मुख्यमंत्र्यांनी नुकतचं आपल्या भाषणात यशवंतराव चव्हाणांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्याचे काम हे सरकार करतेय, असे विधान केले होते. याला शरद पवार यांनी आपल्या शैलीत उत्तर दिलंय. मुख्यमंत्र्यांचे हे वक्तव्य म्हणजे या वर्षातील सर्वात मोठा विनोद असल्याचे टीकास्त्र शरद पवारांनी सोडल आहे.
आज महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी असल्याने कराडमधील प्रीतिसंगमावर राज्यातील नेत्यांची गर्दी आहे. या ठिकाणीही नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपांची जोरदार जुगलबंदी रंगल्याचे दिसत आहे.
आज सकाळी मुख्यमंत्र्यांनी कराडातील प्रीतिसंगम या स्मृतीस्थळावर जाऊन यशवंतरावांच्या स्मृतीस अभिवादन केले. त्यानंतर काहीच वेळात राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार त्या ठिकाणी आले होते.