राम मंदिराप्रमाणेचं ‘बाबरी माशिदी’साठी ट्रस्ट तयार करून मदत करायला हवी : शरद पवार

टीम महाराष्ट्र देशा : अयोध्येत राम मंद्रीसाठी ट्रस्ट उभारून आर्थिक मदत दिली जात आहे. पण बाबरी मशीद पाडली त्यासाठी सरकार काही मदत करत नाही. बाबरी मशिदीसाठीही ट्रस्ट तयार करून मदत करायला हवी.असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लखनऊ येथे बोलतांना व्यक्त केले.

राष्ट्रवादीच्या उत्तर प्रदेशातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी योगी आदित्यनाथ सरकारवर टीका करत उत्तर प्रदेशच्या अर्थसंकल्पावर टीका केली. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काहीच नाही. बेरोजगारांसाठी मासिक प्रशिक्षण भत्ता देण्याची तरतूद केली पण तो मिळेल की नाही हे सांगणं कठीण असल्याचं म्हटलं.

Loading...

उत्तर प्रदेशात विरोधी पक्षांना एका व्यासपीठावर आणून भाजपची कोंडी करण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार करत आहेत. बुधवारी लखनऊ इथं झालेल्या कार्यक्रमावेळी शरद पवार यांनी देशाला धर्माच्या आधारे विभागलं जात असल्याचा आरोप केंद्रातील आणि उत्तर प्रदेशातील भाजप सरकारवर केला.

भाजपकडून फोडा आणि राज्य करा नीती वापरली जात असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला. आता जनतेला त्यांचे डाव समजले आहेत. त्यांच्या बोलण्यात लोक अडकणार नाहीत. सीएए आणि एनआरसीमध्ये अनेक त्रुटी आहेत. यात अल्पसंख्यांक असलेल्या मुस्लिमांकडे दुर्लक्ष केल्याचंही शरद पवार यांनी सांगितले.आता यावर काय प्रतिक्रिया येते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
#मरकज : मशीद खाली करण्यास मौलानांनी दिला नकार,  अजित डोवालांना उतरावं लागल मैदानात
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका