fbpx

शरद पवार महाभारतातील शकुनी मामा – पूनम महाजन

टीम महारष्ट्रा देशा – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तुलना रामायणातील मंथरा आणि महाभारतातील शकुनी मामा आहेत, तर काँग्रेसने प्रियांकांचे इतके फोटो पसरवले, की ती तैमूर अली असल्यासारखीच वाटत होती, अशी टीका भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा आणि मुंबईतील भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांनी यांनी केली आहे.

मुंबईत सोमय्या मैदानावर आयोजित भाजयुमोच्या सीएम चषक पारितोषिक वितरण सभारंभात त्या बोलत होत्या.

महाजन म्हणाल्या की, शरद पवार हे रामायणातील मंथरा, तर महाभारतातील शकुनी मामा आहेत. सगळ्यांचं ऐकल्याचं दाखवून शकुनी मामासारखे नाक खुपसून सगळीकडे महाभारत सुरु करणारे शरद पवारही या महाआघाडीत आहेत. स्वत:ला मिळालं नाही, की इकडचं तिकडे, तिकडचं इकडे करणाऱ्या मंथरा आणि शकुनीसारखी पवारांची अवस्था आहे. असे हे सगळे मिळून मोदींच्या विकासरथाला अडवू पाहत आहेत.

परंतु महाआघाडीच्या दलदलीत भाजपचं कमळच उमलेल असा विश्वास पूनम महाजन यांनी व्यक्त केला.विरोधकांची महाआघाडी म्हणजे महा’ठग’बंधन असल्याचा घणाघातही त्यांनी केला.

1 Comment

Click here to post a comment