देशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट !

टीम महाराष्ट्र देशा : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारविरोधात सर्व विरोधीपक्षांना एकत्र करत, कोलकात्यात मेगा रॅलीचं आयोजन केलं होत. देशभरातील दिग्गज नेत्यांनी या महा रॅलीला हजेरी लावली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेस खासदार मल्लिकार्जुन खर्गे, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, गुजरातमधील पाटिदार नेते हार्दिक पटेल, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यासह प्रमुख विरोधी पक्षांचे सर्व दिग्गज उपस्थित होते.

यावेळी बोलताना शरद पवार यांनी आपल्या भाषणात मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. मात्र या भाषणात एक गोष्ट नवीन होती ती म्हणजे पवारांच्या भाषणाचा शेवट. नेहमी जय हिंद जय महाराष्ट्र असा शेवट करणाऱ्या पवारांनी आज आपल्या भाषणाचा ‘जय हिंद जय बांगला’ असा केला. आणि उपस्थितांचे मने जिंकून घेतले.

Loading...

यावेळी बोलताना पवार म्हणाले, “आम्ही आपल्याला आश्वासन देतो की आम्ही तुमच्या हक्काचं रक्षण करु, आम्ही एकत्र राहून तुमच्या हक्काचं रक्षण करु. मोदी सरकार बदलण्यासाठी सर्वजण मेहनत घेऊ. आपल्या सर्वांच्या साथीने देशात नवं सरकार आणू. लोकांच्या हिताचं रक्षण करु, हे सांगून मी आपली रजा घेतो, ‘जय हिंद जय बांगला’.

दरम्यान, “विरोधीपक्षांना संघटीत करण्याचे काम ममताजींनी केलं, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. मोदी सरकारच्या काळात आंबेडकरांनी बनवलेल्या संविधानावर हल्ला करण्याचा प्रयत्न होत आहे. आम्ही देशाला वाचवण्यासाठी एकत्र आलो आहे. शेतकरी आज आत्महत्या करतोय. घटनात्मक संस्थांना धोका निर्माण झाला आहे. जनतेची फसवणूक झाली आहे. देशाला बदल हवा आहे” अस देखील पवार म्हणाले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
पवारांना सतावतेय पाकिस्तानातील मुस्लिमांची चिंता,म्हणाले....
'हिंसक वळण लावणारे, तोडफोड करणारे कार्यकर्ते हे वंचित बहुजन आघाडीचे नाहीत'
...तर भाजप - मनसे एकत्र येऊ शकतात; पाटलांनी दिले युतीचे संकेत
'एमआयएम'ने आजपर्यंत सगळ्यांनाच शिंगावर घेतलयं, मनसेला घाबरत नाही
मनसेच्या संघटना बांधणीची जबाबदारी बारामतीकराच्या खांद्यावर
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
पुन्हा मोदी सरकार येणार व मी पुन्हा मंत्री होणार : रामदास आठवले
सावधान : मुंबई आणि पुण्यातही आढळले‘कोरोना'चे संशयित रुग्ण