पुणे: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सर्व भारतीयांच्या एकतेचा आधार आपली मातृभूमी व देशाच्या गौरवशाली परंपरा आहेत. भारतात राहणाऱ्या हिंदू आणि मुसलमानांचे पूर्वज एकच आहेत. आपल्या दृष्टीने हिंदू हा शब्द आपली मातृभूमी, पूर्वज आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाचा प्रतिशब्द आहे. म्हणूनच आम्ही प्रत्येक भारतीय नागरिक हिंदूच आहेत असे मानतो. कोणाच्याही मताचा येथे अनादर होणार नाही. परंतु आपणास मुस्लिम वर्चस्वाचा नव्हे तर भारतीय वर्चस्वाचा विचार करावा लागेल. असे विधान केले होते. दरम्यान आता यावरच राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मोहन भागवत यांनी आता एक नविनच गोष्ट सांगितली की, दोन्ही समाजांचा मूळ जन्म हा एकाच कुटुंबातून झाला आहे. हिंदू आणि मुस्लीम समाजाचे पूर्वज एकच आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे माझ्याही ज्ञानात भर पडली ते वाचून.अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.
दरम्यान मोहन भागवत यांच्या वक्तव्याने पुन्हा एका नवीन वादाला तोंड फोडले आहे. त्यांच्या वक्तव्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत हीच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची भूमिका आहे – मलिक
- देशाला अग्रेसर करण्यासाठी सर्वांना सोबत प्रयत्न करावे लागतील – सरसंघचालक
- अण्णासाहेब पाटील महामंडळाला तातडीने १०० कोटी रुपये द्या; नरेंद्र पाटील यांची मागणी
- लूक आऊट नोटीस म्हणजे नेमकं काय? ही नोटीस केव्हा जारी केली जाते?
- अनिल परब यांचे निकटवर्तीय बजरंग खरमाटेंची ईडीकडून ८ तास चौकशी