पुणे : सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच गढूळ झालं आहे. त्यात सगळीकडे निवडणूकांचं वारंही घुमू लागलं आहे. याच पार्श्वभूमीवर अंधेरी (पूर्व) विधानसभा मतदारसंघाची पोट निवडणूक (Election) जाहीर करण्यात आली आहे. अंधेरी पूर्व मतदार संघातील शिवसेनेचे आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांचे 12 मे रोजी निधन झालं आहे. त्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. ही निवडणूक शिवसेना (Shivsena) आणि भाजप (BJP) पक्षामध्ये होणार असल्यामुळे याविषयी अनेक चर्चा रंगू लागल्या आहे. अशातच यासंदर्भात राष्ट्रवादी (NCP) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी कोणत्या पक्षाला आपला पाठिंबा देणार हे सांगितलं आहे.
काय म्हणाले शरद पवार ?
होणाऱ्या पोट निवडणूकीमध्ये आपण कोणाला पाठिंबा देणार ?, असा सवाल शरद पवार यांना करण्यात आला. त्यावर ते म्हणाले, राष्ट्रवादी पक्ष अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेनेला मदत करणार आहे. पुण्यामध्ये काँग्रेसचे नेते आबा बागुल यांनी नवरात्र महोत्सवात महर्षी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. त्यावेळी त्या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित होते. कार्यक्रम झाल्यानंतर शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
तसेच, अंधेरी (पूर्व)च्या विधानसभा जागेवर भाजप पक्षाकडून ‘मुरजी पटेल’ (Muraji Patel) यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर शिवसेनेनं रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा रमेश लटके (Rutuja Ramesh Latke) यांना उमेद्वारी दिली आहे. परंतू शिवसेनेकडे असलेल्या या जागेवर शिंदे गटाकडून (Shinde Group) दावा करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.
शिवसेनेची फडणवीसांकडे मागणी
दरम्यान,अंधेरी पूर्व मतदार संघातील पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी शिवसेना पक्षाने मागणी आहे. यासंदर्भात शिवसेनेचे विलेपार्ले उपविभाग प्रमुख जितेंद्र जानावळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देखील लिहीलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस शिवसेना पक्षाची ही मागणी स्विकारतील की नाही?, हे पाहणं महत्वाचं ठरणारं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Shivsena । आधी 16 सदस्यांच्या अपात्रतेचा मुद्दा, नंतर चिन्हाची लढाई, अंबादास दानवेंनी स्पष्टचं सांगितलं
- Abdul Sattar | “महाविकास आघाडीत मुंडकी खाणारा डायनासॉर”
- Dengue Prevention | डेंग्यू होण्यापासून वाचण्यासाठी करा ‘हे’ उपाय
- Jayant Patil । अशोक चव्हाण म्हणत असतील, तर…; जयंत पाटलांचा मोठा दावा
- Abdul Sattar | चंद्रकांत खैरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर अब्दुल सत्तार म्हणाले…