मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या काल झालेल्या सभेत पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. शरद पवारांना हिंदू या शब्दाची ऍलर्जी आहे, अशी टीका त्यांनी केली. त्यावर आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली. जर राज ठाकरेंनी अशी टीका केली आहे तर शरद पवारांनी याच उत्तर द्यावं, असं मुनगंटीवार यावेळी म्हणाले. तसेच पवारांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक वेळा भूमिका बदलल्या असं म्हणत पवारांच्या भूमिका या ऋतूप्रमाणे बदलत असतात अशी टीका त्यांनी यावेळी केली.
सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांवर देखील टीका केली. उद्धव ठाकरे यांनी आमच्याशी धूर्तपणाने वागणार, असे सांगणे म्हणजे स्वतःचा स्वभाव सांगितल्याची मुनगंटीवार म्हणाले. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपण भाजपशी धूर्तपणाने वागणार असे विधान केले. यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करून स्वतःचा स्वभाव सांगितला असल्याचे मत व्यक्त केले.
गृहमंत्र्यांवर बोलताना मुनगंटीवार म्हणाले, दिलीप वळसे पाटील हे सज्जन व्यक्ती आहेत. पण आता त्यांचा मेंदू राजकीय झाला आहे. उस्मानीवर काय कारवाई झाली, हे अजून कळलेले नाही. मंत्रालयात हजारो दारूच्या बाटल्या सापडल्या. कोण याचा सूत्रधार होता, कोण दारूच्या बाटल्या देऊन फायलींवर सह्या घ्यायचा, हेही कळले नाही. त्यांना भीमाशंकर सद्बुद्धी देवो, अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
संजय राऊतांना टोला
बाबरी मशीद पडल्यानंतर ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, त्यात शिवसैनिक किती होते, याची माहिती संजय राऊत यांनी जाहीर करावी, असे प्रति आव्हान भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. एफआयआर दाखल झालेल्या यादीत एकतरी शिवसैनिक दाखवून द्यावा. तेव्हा आम्ही मानू की राऊत सत्य बोलत आहेत. मी असो, भंडारी असोत किंवा खुद्द राऊत असोत, कोण काय बोलतो, हे महत्वाचे नाही. एफआयआरमध्ये शिवसैनिकांची नावे राऊत यांनी दाखवावी किंवा एफआयआर जेव्हा दाखल होत होता, तेव्हा धुर्तपणे काँग्रेसची माफी मागून आपली नावे एफआयआरमधून काढली का, ते स्पष्ट करावे, असे मुनगंटीवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: