‘शेतकऱ्यांच्या आजच्या दुर्दशेला शरद पवारच जबाबदार’

सोलापूर : गेली पन्नास वर्ष महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात विविध पदे भूषवणारे शरद पवार यांना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यात अपयश आले आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे पवारांचं पाप आहे, असा घणाघाती आरोप शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी केला.

श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शरद पवार हे गेल्या पन्नास वर्षांपासून राजकारणात आहेत. त्यांनी आतापर्यंत मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय कृषिमंत्री अशी अनेक पदे भूषवली आहेत. ज्याप्रमाणे राज्याच्या प्रगती श्रेय शरद पवार घेतात त्याप्रमाणे राज्यात शेतकऱ्यांच्या झालेल्या आत्महत्येची जबाबदारीही त्यांचीच असे म्हणावी लागेल. त्यांना हे मान्य नसेल तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशामुळे झाल्या हे त्यांनी सर्वांसमोर जाहीर करावे, असे आव्हानही रघुनाथ पाटील यांनी पवारांना दिले.

Loading...

पवारांनी आतापर्यंत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कधीही आक्रमक भूमिका घेतली नाही तसेच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी साठी शिफारसीसाठी कधीही आग्रही भूमिका घेतलेली नाही. ज्याप्रमाणे प्रगतीचे श्रेय ते घेत आहेत त्याप्रमाणे शेतकर्यांच्या आत्महत्येचा पापही त्यांनी स्वीकारले पाहिजे, असेही पाटील म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये राज्यातील आणि केंद्रातील शेतकऱ्यांना स्वप्न दाखवले होते मात्र तेही अपयशी ठरले आहे. मोदी सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न कमी करण्या ऐवजी ते अधिकच वाढून ठेवले आहेत. शेतकरीच संकटात असताना देश महासत्ता कसा होणार हे मोदी यांनी सांगावे असा सवालही रघुनाथ पाटील यांनी केला.

कोणतेही सरकार आले तरी शेतकऱ्यांचे प्रश्न भेटणार नाही त्यासाठी सरकार नाही तर धोरण बदलणे आवश्यक आहे शेतकरी सुखी झाला तर राज्यातील आणि देशातील बर्यापैकी प्रश्न सुटतील असेही रघुनाथ पाटील यांनी सांगितले. निवडून आलेले आहेत त्यांचे धोरण शेतकरी संघटनेला मान्य आहेत जे समाजात बुद्धिमान लोक असे आहेत त्यांचेही म्हणणे सरकारने ऐकले पाहिजे असेही रघुनाथ पाटील यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ सोराडे उपस्थित होते.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनाविरोधात लढण्यासाठी रिलायंस कंपनीने घेतला 'मोठा' निर्णय; केली तब्बल 'इतक्या' कोटींची मदत
#Corona : कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटीव्ह, इंस्टा अकाऊंटवरून केली भावनिक पोस्ट
दारुड्यांसाठी अत्यंत वाईट बातमी...दुकाने सुरु होण्यासाठी पहावी लागणार आणखी वाट
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना ( कोव्हिड-१९ ) संसर्गाची भिती कोणाला ?
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?