सतेज पाटलांच ‘आमच ठरलंंय’, शरद पवार म्हणतात ‘मी ध्यानात ठेवलंय’

sharad pawar

कोल्हापूर: कोल्हापूर लोकसभेचे राष्ट्रवादी कॉंग्रेस उमेदवार धनंजय महाडिक आणि कॉंग्रेस नेते सतेज पाटील यांच्यातील वाद अद्याप कायम आहे, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी आघाडीचे नेते प्रयत्नशील आहेत, मात्र आता वाढदिवसाच्या फ्लेक्सवर सतेज पाटील यांनी ‘आमच ठरलय’ लिहित महाडिक यांना इशारा दिला आहे. तर पाटील यांना उत्तर देताना शरद पवार यांनी मीही ‘ध्यानात ठेवलंय’ असे म्हंटले आहे.

आज रस्त्यावरून येताना ‘आम्ही ठरवलंय’ अशी जाहिरात पाहिली, पण ठीक आहे ठरवा, लक्षात ठेवा मी पण ध्यानात ठेवलंय, म्हणत शरद पवार यांनी सतेज पाटील यांचे नाव न घेता टोला लगावला आहे. शेतकर्‍यांना उद्ध्वस्त करणार्‍यांना सत्तेपासून बाजूल करायचं असेल, तर संकुचित विचार करून चालणार नाही, कोल्हापूरच्या मातीतील व्यक्ती अशा गोष्ठी करणार नाही, असा विश्वास देखील पवार यांनी व्यक्त केला आहे . हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार राजू शेट्टी यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते.

नेमका काय आहे महाडिक – पाटील वाद

सतेज उर्फ बंटी पाटील हे कॉंग्रेसचे विधानपरिषदेतील आमदार आहेत तर धनंजय उर्फ मुन्ना महाडिक हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार आहेत. खरतर यांच्यातील वादाला सुरुवात झाली ती २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून, या निवडणुकीत धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांचा पाठिंबा मागितला होता. सतेज पाटील यांनीही महाडिकांना मदत करण्याचं आश्वासन दिलं आणि जोरदार प्रचार करत दिलेलं आश्वासन पाळलं देखील, त्यामुळे मोदी लाटेतही धनंजय महाडिक खासदार म्हणून निवडून आले. या निवडणुकीत धनंजय महाडिक यांच्या विजयात सतेज पाटलांच्या सिंहाचा वाट होता.

लोकसभेनंतर विधानसभेत आघाडीत बिघाडी झाली त्यामुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने वेग-वेगळ लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सतेज पाटील आणि अमल महाडिक यांच्यात लढत झाली. अमल महाडिक हे धनंजय महाडिक यांचे चुलत भाऊ आहेत. त्यामुळे या निवडणुकीत धनंजय महाडिक यांनी सतेज पाटलांच्या विरोधात अमल महाडिक यांचा प्रचार केला. त्यामुळे सतेज पाटलांचा पराभव झाला आणि खऱ्या अर्थाने वादाला सुरुवात झाली. लोकसभेसाठी केलेल्या मदतीची जाणीव न ठेवत महाडिक यांनी आपली फसवणूक केली असा आरोप सतेज पाटलांनी केला.