सुशांत सिंह राजपूत प्रकरणी शरद पवारांनी व्यक्त केली ‘हि’ प्रतिक्रिया

Sharad pawar Sushant Sinha

मुंबई : १४ जून रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा मृत्यू झाला होता. यानंतर, या मृत्यूमागे घातपात असण्याची शक्यता त्याच्या घरच्यांनी व्यक्त केला होता. तर, सुशांतच्या अचानक जाण्याने त्याच्या लाखो फॅन्सना देखील धक्का बसला होता. याप्रकरणी आता बॉलिवूड कनेक्शन पासून राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप व संबंध यावरून चांगलेच राजकारण पेटलेले दिसत आहे.

याप्रकरणी अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत, मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र मौन बाळगले होते. मुंबई पोलिसांचा तपास, राज्य सरकारची निर्णय प्रक्रिया, बिहारच्या राज्य सरकारसह पोलिसांनी केलेले आरोप यावरून विरोधक आक्रमक भूमिका घेत असल्याचे दिसून आले होते. यानंतर, आता याप्रकरणी शरद पवार यांनी देखील आपली पाहिली प्रतिक्रिया दिली आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

कोटींची पारितोषकं देणारे राजकारणी यावर्षी ‘ती’ रक्कम गोविंदा मंडळांना का वाटत नाहीत?

“एका अभिनेत्याने आत्महत्या करणं दुर्दैवी आहे. पण मीडियात ज्या पद्धतीने चर्चा होत आहे त्याचं आश्चर्य वाटतं. माझ्या जिल्ह्यात २० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. पण मीडियाने त्याची नोंदही घेत नाही,” अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त केली.“महाराष्ट्र तसंच मुंबई पोलीस सक्षम आहेत. त्यांच्यावर मला १०० टक्के विश्वास आहे. पण तरीही सीबीआय किंवा इतर यंत्रणेने तपास करावा असं वाटत असेल तर मी त्याला विरोध करणार नाही. चौकशी कोणी करायची हा राज्य सरकार, सीबीआयचा प्रश्न आहे,” असं शरद पवार यांनी सांगितलं.

वीज बिलात सूट मिळणार?