Sharad Pawar | मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याबाबत शिवरायांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी आक्रमक भूमिका घेतली असून त्यांची पदावरून हकालपट्टी करण्याची मागणीही केली आहे. दरम्यान, या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“उदयनराजेंनी चांगली भूमिका घेतली आहे. त्यांच्याबद्दल आम्हा लोकांना समाधान आहे. पण, राज्य आणि केंद्र सरकारची भूमिका बघ्याची आहे. त्यामुळे लोकांमध्ये संताप व्यक्त होत आहे,” असं शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटलं.
“छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपालांनी काढलेले उद्गार चुकीचे होते. मला खात्री आहे, आज ना उद्या केंद्र सरकारला त्यांच्याबाबत निर्णय घ्यावा लागेल. लवकरच तो बदल झालेला आपल्याला पाहायला मिळेल,” असं मत शरद पवारांनी मांडलं.
चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याबाबत देखील शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. शाळा काढण्यासाठी या महापुरुषांनी भीक मागितली हे वक्तव्य संतापजनक आणि दुर्दैवी आहे. याबाबत राज्यकर्त्यांना तारतम्य नाही. कर्मवीर भाऊराव पाटलांनी मुलांना जेवायचा प्रश्न आला तेव्हा स्वत:च्या पत्नीचे दागिने विकले ते काय भीक मागून नव्हे, असं म्हणत शरद पवार यांनी चंद्रकांत पाटलांना सुनावलं.
महत्वाच्या बातम्या :
- Ashish Shelar | संजय राऊतांनी शिक्षणासाठी रामभाऊ म्हाळगीत जावे ; आशिष शेलारांचा टोला
- Eknath Shinde | “सिल्वर ओकचे तुम्ही दलाल”; राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर शिंदे गटात गेलेल्या पदाधिकाऱ्यांचा पलटवार
- Skin Care Tips | चेहऱ्यावर ‘या’ पद्धतीने कोरफड लावल्याने होतील अनेक समस्या दूर
- Sanjay Raut | “शिंदे गटात गेलेले सगळे दलाल, सगळी झुंड आमच्या दारात…”; राऊतांची सडकून टीका
- BJP | “भाजपाकडून भुंकण्यासाठी श्वानपथक नियुक्त, त्यांचा रिमोट…” ; कोणी केली टीका?