Share

Sharad Pawar | “…मग एकतर्फी निकाल लागणारच”; गुजरात निकालावर शरद पवार यांचं सूचक वक्तव्य 

Sharad Pawar | मुंबई : गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने बाजी  मारली असून यावर विरोधकांकडून प्रतिक्रिया येत आहेत. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया देत भाजपला टोला लगावला आहे. निकाल एकतर्फी होईल याबद्दल कुणाच्याही मनात शंका नव्हती. अनेक निर्णय एका राज्याला सोयीचे घेतले गेले. अनेक प्रकल्प त्या राज्यात कसे जातील याची काळजी घेण्यात आली, त्याचा हा परिणाम होणार हे सर्वांना माहिती होतं, असं पवार म्हणालेत.

पुढे ते म्हणाले, “देशात एक वेगळं वातावरण आहे नुकतेच निवडणुका पार पडल्या. या निवडणुका एक वेगळी दिशा दाखवायला लागली आहे. गुजरातची निवडणूक एकतर्फी होईल याबद्दल कुणाच्याही मनात शंका नव्हती. पण गुजरातचा निकाल लागला याचा अर्थ देशात एका बाजूने मतप्रवाह आहे असा नाही. कारण दिल्ली महापालिकेत भाजपची सत्ता आपने खेचून आणली आहे.”

हिमाचल मध्ये भाजपचं राज्य होतं त्या ठिकाणी आता काँग्रेसला जास्त जागा मिळाल्या आहेत. भाजपचं राज्य गेलं आहे. दिल्लीमध्ये गेलं, पंजाबमध्ये देखील गेलं आहे आणि आता हिमाचलमध्ये देखील राज्य गेलं आहे. याचा अर्थ हळूहळू आता बदल व्हायला लागला असल्याचं सूचक वक्तव्य शरद पवार यांनी केलंय.

“राजकारणात अनेक वेळा पोकळी असते. गुजरातची पोकळी भाजपने भरुन काढली आणि दिल्लीची पोकळी केजरीवालांनी भरुन काढली. देशातील अनेक लोकांना बदल हवे आहेत, याची नोंद राजकीय कार्यकर्त्यांना घ्यायला हवी. ही पोकळी कशी भरुन काढायची याचा विचार करायला हवा. ही पोकळी आता लवकरच भरुन काढण्यासाठी आपण तयारीला लागलं पाहिजे. आता आपल्याला एकत्र येऊन राजकारण करणे गरजेचे आहे”, असं शरद पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

Sharad Pawar | मुंबई : गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने बाजी  मारली असून यावर विरोधकांकडून प्रतिक्रिया येत आहेत. यावर आता राष्ट्रवादी …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now