Share

Sharad Pawar | महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक झाल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “उद्यापासून…”

Sharad Pawar | मुंबई : महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील वाद वाढत चालला आहे. दोन राज्यांमधील हा वाद पाच दशकांहून अधिक जुना आहे. त्यामुळे राजकारणही होत आहे. अशातच बेळगाव येथे महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक करण्यात आली आहे. बेळगावजवळ हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

शरद पवार म्हणाले, “राज्य-कर्नाटक सीमेच्या बाबतीत झालं आहे ते अत्यंत निषेधार्थ आहे. गेल्या काही आठवड्यांपासून हे प्रकरण सुरु आहे. सीमा भागाशी मी अनेक वर्षे संबंधित आहे. मला स्वत:ला लाठीहल्ल्याला तोंड द्यावे लागले.”

“दोन्ही राज्यातील मुख्यमंत्री यानी पुढाकार घेऊन परिस्थिती निवाळावी यासाठी प्रयत्न केले पाहिजे होते. पुढील २४ तासात परिस्थिती निवळली पाहिजे. कर्नाटकचे मुख्यमंत्री जबाबदार रहातील. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून चिथावणीखोर भूमिका जर घडत असेल तर देशाच्या स्थैर्याला मोठा धक्का असेल. केंद्राला बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही”, असंही पवार म्हणालेत.

त्याचबरोबर “उद्यापासून संसदीय अधिवेशन सुरु होत आहे. राज्यातील खासदारांना सांगणार आहे की भूमिका मांडा. कोणी कायदा हातात घेतला, तर त्याची जबाबदारी केंद्र सरकार आणि कर्नाटकला घ्यावी लागेल,” असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे.

“नपुंसक पद्धतीने राज्य चालवलं जातयं. छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद म्हणण्याचा हक्क भाजपाने कायमचा गमावला आहे. इतकं नपुंसकत्व ते सतत सिद्ध करत आहेत. दिल्लीचेही तख्त सोडाच, दिल्ली पुढेही गुडघे टेकतो महाराष्ट्र माझा अशी यांची अवस्था आहे,” अशी घणाघाती टीका अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी राज्य सरकारवर केली आहे.

महत्वाच्या बातम्या :

Sharad Pawar | मुंबई : महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील वाद वाढत चालला आहे. दोन राज्यांमधील हा वाद पाच दशकांहून अधिक जुना …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics