fbpx

शरद पवार – राज ठाकरे यांचा एकत्र हवाई प्रवास

औरंगाबाद – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय जवळीक वाढताना दिसत आहे. मनसेला आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही असल्याचे वृत्त आले होते. दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसेप्रमुख राज ठाकरे हे औरंगाबादहून एकाच विमानातून मुंबईकडे रवाना झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

मनसेप्रमुख राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून विदर्भ दौऱ्यावर होते. तो दौरा आटोपल्यानंतर आज राज ठाकरे औरंगाबाद येथे आले होते. दरम्यान, आज संध्याकाळी राज ठाकरे मुंबईकडे रवाना झाले. याच विमानातून शरद पवार प्रवास करत होते. शरद पवार आणि राज ठाकरे हे एकाच विमनातून प्रवास केला. या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली मात्र समोर आलेलं नाही.

महामुलाखत: नरेंद्र मोदी हे तुमचे शिष्य आहेत पण ते तुमच ऐकतात का?