शरद पवारांनी दुष्काळग्रस्त भागासाठी तासाभरातच उभारला पाच कोटींचा निधी!

सातारा: माजी कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माण आणि खटाव या दुष्काळग्रस्त भागात जलसंधारणाच्या कामासाठी अवघ्या एका तासात पाच कोटींचा निधी उभारला आहे. पवार साहेब सध्या खटाव या दुष्काळी तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत.

शरद पवारांनी वॉटरकप स्पर्धेतील सहभागी विविध गावांना भेटी दिल्या, दरम्यान त्यांनी सरकारच्या कामावर अवलंबून न राहता मदत करण्याची ग्वाही दिली. पवारांनी पुणे, मुंबई येथील संस्था, जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा बॅंकेचे चेअरमन शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना संपर्क करून मदत करण्याची विनंती केली.

शरद पवारांनी त्यांच्या शब्दाची ताकद एका तासात दाखवून दिली. तसेच संस्था, आणि अनेक नेत्यांनी साहेबांच्या शब्दाला मान देत निधी दिला. शरद पवार म्हणाले “दुष्काळाचे नामोनिशाण मिटवा, लागेल ती मदत करायला मी आहेच” त्यामुळे गावकऱ्यांना सुद्धा धीर मिळाल्याचे चित्र होते.