fbpx

जी टोपी घालुन मौलाना आझाद देशासाठी तुरुंगात गेले ती टोपी घालायला मला लाज का वाटेल – शरद पवार

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये पुणेरी पगडीवरून राजकारण चांगलंच रंगलं होतं. पुण्यामध्ये कुठल्याही कार्यक्रमात पाहुण्याचं स्वागत पुणेरी पगडीने करण्याची प्रथा आहे. मात्र राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शरद पवार यांनी या प्रथेला फाटा देत, भुजबळ यांचं स्वागत फुले पागोट्याने केलं होतं. तसेच यापुढे राष्ट्रवादीच्या कुठल्याही कार्यक्रमात पुणेरी पगडीने नाही तर फुले पागोट्याने स्वागत होईल असं देखील म्हंटलं होतं.त्यामुळे पवारांवर टीका देखील झाली होती.

दरम्यान आता पुन्हा एकदा शरद पवार एका ट्विटमुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी आपल्या ट्विटमधून टोपी न घालणाऱ्या नरेंद्र मोदी,योगी आदित्यनाथ यांच्यासह अन्य भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे. शरद पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, मला एकजण म्हणाला तुमच्या डोक्यावर टोपी ठेवली तर चालेलं का, तेव्हा मी त्याला म्हणालो की, जी टोपी घालून मौलाना आझाद देशाची लढाई लढले ती टोपी घालण्यात मला अभिमानच वाटेल. ते आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये म्हंटले आहेत की ज्यांच्या हातात आज संपूर्ण देश आहे. तेच ही टोपी घालण्यास नकार देत असून, दुर्दैवाने ते देशात फूट पाडतं आहेत.

दरम्यान आता शरद पवार यांनी ज्या पुणेरी पगडीने भुजबळांचं स्वागत करण्यास नकार दिला.तीच पगडी घालून टिळक,आगरकर, लोकहितवादी हे सर्व मोठे नेते देशासाठी लढले मग पवारांनी पुणेरी पगडीला का नाकारले? त्याच टोपीचा न्याय पुणेरी पगडीला का लावला नाही? असा सवाल आता याठिकाणी उपस्थित होतोय.

 

पवारांनी माझ्या कॉलरचे अनुकरण केले. हे बास झाले. अजून काय पाहिजे ? : उदयनराजे

तिहेरी तलाकविरोधात रान पेटवणाऱ्या इशरत जहाँचा भाजपमध्ये प्रवेश