साताऱ्याच्या बालेकिल्ला आमचाचं; पवारांचं शिवेंद्रराजेंना थेट आव्हान

टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून आमदार भाजपमध्ये प्रवेश करत आहे. बुधवारी शिवेंद्रराजे भोसले यांनी देखील कमळ हाती घेतले आहे. साताऱ्याची जागा आम्हीच राखणार, असे म्हणत शिवेंद्रराजेंना शरद पवारांनी थेट आव्हान दिले आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सातार्‍यात माध्यमांशी संपर्क साधला यावेळी ते बोलत होते.

याच पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जावलीचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकार्‍यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीची प्रचंड पडझड झाली.

तसेच पुढे बोलताना पवार म्हणाले, भाजपमध्ये मेघा भर्ती चालू आहे. याला मेघा भर्ती म्हणता येणार नाही कारण हातच्या बोटावर मोजता येतील इतके लोग प्रवेश करत आहेत. पक्ष प्रवेश हे होत राहतात आणि याचा सराव मला असल्याच मत व्यक्त केलं आहे, असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यावेळी म्हणाले.

दरम्यान, लोकसभा निवडणूकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहेत. महाराष्ट्रातील राजकारणाच्या सारीपाटावर शह काटशह चं राजकारण सुरु झालं आहे. कधी कोण कोणाच्या गळ्याला लागेल आणि कोण कोणाची साथ सोडेल याचा काही नेम नाही. वार फिरेल तसं विरोधी पक्षाचे आमदार टोपी फिरवू लागले आहे.

महत्वाच्या बातम्या 

लोकसभेला प्रामाणिक कामे करून देखील आमच्याबद्दल शंका-कुशंका घेतल्या जात आहेत’

अबब ! माजी पंतप्रधानाच्या पोऱ्या भाजपातंं

काँग्रेसची नवी रणनीती : बाळासाहेब थोरात पवारांच्या भेटीला ‘या’ विषयावर चर्चा

शिवेंद्रराजेचं काय राणा जगजितसिंह देखील भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत : अजित पवार