fbpx

आगामी विधानसभेसाठी शरद पवार यांचा ‘हा’ आहे मास्टर प्लान

jayant patil and sharad pawar

कुर्डूवाडी /हर्षल बागल : दोन दिवसापुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी कुर्डूवाडी येथे आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवुन अतिशय समजुतीची व समयसुचकतेची वक्तव्य केली अाहेत. कै.के.एन भिसे यांच्या पुतळ्याचे अनावरण व मा.आ. विनायकराव पाटिल यांचा अमृत महोत्सव सोहळ्यात खा. पवार यांनी आराम करण्याचा सल्ला वजा आदेशच आ. बबनराव शिंदे यांचे नाव घेत दिला आहे. पक्षाअंतर्गत असलेल्या वादांमुळे व गटतटामुळे झालेले नुकसान याची किंमत खा. पवार यांना ऊमजली असल्याने करमाळ्याचा वाद मिटवण्याचे संकेत पवार यांनी दिलेत. करमाळा माढा पंढरपुर साठी मास्टर प्लान खा. पवार यांनी आखला आहे.

सोलापुर जिल्ह्याची धुरा पुर्वी शंकरराव मोहिते पाटिल , विठ्टलराव मोहिते पाटिल , भाई एस एम पाटिल , आ. गणपतराव देशमुख , व आ. बबनराव शिंदे यांच्या खांद्यावर होती.आज ती धुरा संजय शिंदे जिल्हा परिषदेच्या निमीत्ताने संभाळत आहेत. आत्ता बबनराव शिंदे तुम्ही आराम करा नव्या तरुन नेतृत्वाला संधी द्या. तुमची जबाबदारी संजय शिंदे पाहू शकतात असे सुचक वक्तव्य खा. शरद पवार यांनी करुन करमाळ्याचा मोठा तिढा सुटणार असे संकेत दिले आहेत .

करमाळा विधानसभेत गतनिवडणुकित संजय शिंदे अचानक ऊभा राहिल्याने रश्मी बागल यांना पराभवाचा सामना करावा लागला आणी शिवसेनेचे नारायण आबा पाटिल निवडुन आले. संजय शिंदे यांनी विधानपरिषदेत राष्ट्रवादी विरोधात जाऊन दिपकआबा साळुंखे यांच्या विरोधात प्रशांत परिचारक यांना मदत केली. संजय शिंदे यांच्यामुळे दोन राष्ट्रवादीच्या जागा गेल्या. त्या परत निवडून आणण्यासाठी कदाचित शरद पवारांनी संजय शिंदे यांचे कौतुक करित माढ्यातुन निवडणुक लढवण्याचे संकेत दिले आहेत.

जर पवारांच्या आदेशानुसार संजय शिंदे यांनी माढ्यातुन निवडणुक लढवली तर करमाळ्यात राष्ट्रवादीची ताकत वाढेल .योग्य रणनीती आखल्यास करमाळ्याची जागा रश्मी बागल जिंकू शकतात अन्यथा ये रे माझ्या मागिल दिवसा असे म्हणत शिंदे बागल वादात पुन्हा नारायण पाटिल आमदार होण्याचे नाकारु शकत नाही. माढ्यातुन संजय शिंदे देखील निवडून येऊ शकतात असा विश्वास खा. पवारांना असु शकतो . पंढरपुर विधानसभेचे अामदार भारत भालके यांनी गतनिवडणुकित काँग्रेस मधुन राष्ट्रवादीच्या ऊमेदवाराचा पराभव केला होता. अलीकडे अनेक दिवस सातत्याने राष्ट्रवादीच्या स्टेजवर भारत नाना भालके दिसत आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा ही राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढवली जाऊ शकते .

करमाळा , माढा , पंढरपुर हे राष्ट्रवादीचे बाले किल्ले मानले जात आहेत. करमाळ्यातुन रश्मी दिदी बागल , माढ्यातुन संजय मामा शिंदे , तर पंढरपुर मधुन भारत नाना भालके , व्युहरचना खा. शरद पवार यांच्या डोक्यात अनेक वक्तव्यातुन दिसत होती. एकुणच सोलापुर जिल्ह्याला पुन्हा राष्ट्रवादीमय करण्याचा मास्टर प्लँन सध्या खा. शरद पवार यांनी आखल्याचे दिसत आहे.

2 Comments

Click here to post a comment