ते डाव्या विचारांचे असले तरी नक्षलवादी नाहीत ; मी त्यांना जाऊन भेटणारच – शरद पवार

टीम महाराष्ट्र देशा : ‘नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांपैकी काहींना आपण ओळखतो. ते डाव्या विचारांचे असले तरी नक्षलवादी असतील आणि कोणाची हत्या करतील, असे आपल्याला वाटत नाही. त्यांना झालेली अटक दुर्दैवी आहे’, असे नमूद करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बुधवारी पुणे पोलिसांच्या कारवाईवर  प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

नक्षली कनेक्शन : अटक केलेल्या पाचही जणांना  नजरकैदेत ठेवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

‘सनातन संस्थेशी संबंध असलेल्या संशयितांवरून लक्ष उडविण्यासाठी त्यांना अटक करण्यात आल्याची शक्यता नाकारता येत नाही’, असे पवार म्हणाले. ‘महाराष्ट्रात अटक करण्यात आलेल्या लोकांना व त्यांच्या कुटुंबियांना आपण भेटणार आहोत’, असे देखील शरद पवार यांनी सांगितले आहे.

सनातन संस्थेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करा – अशोक चव्हाण

मोठी बातमी : डॉ दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्याला पाच वर्षांनंतर अटक