राजेंनी राजेपद नीट सांभाळलं पाहिजे;पवारांनी उदयनराजे भोसले यांना खडे बोल सुनावले

टीम महाराष्ट्र देशा- राजेपद राजांनी सांभाळलं पाहिजे, त्यासाठी सातत्याने खबरादारी घेतली पाहिजे जर असं झालं नाहीतर बऱ्याचंदा त्याचा विनाकारण अनेकांना यातना सहन कराव्या लागतात अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांना खडे बोल सुनावले आहेत. तसंच जनतेतून आपण निवडून आलाय याचं भान बाळगावे अशी सल्लावजा टोलाही शरद पवार यांनी लगावला.न्यूज १८ लोकमत या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पवारांनी हे वक्तव्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाले शरद पवार ?
माझ्या पक्षात काही राजे फिरताय. हल्ली ते सारखे प्रकृतीची चिंता करत आहे. त्यामुळे राजेपद राजांनी सांभाळलं पाहिजे, त्यासाठी सातत्याने खबरादारी घेतली पाहिजे जर असं झालं नाहीतर बऱ्याचंदा त्याचा विनाकारण अनेकांना यातना सहन कराव्या लागतात. हे मी माझ्या अनुभवातून आणि सहकाऱ्यांच्या वतीने सांगतोय. जाणता राजा हे म्हणण्यास फारसं काही वाटत नाही. प्रश्न असा आहे की, समाजकारणासाठी तुम्ही राजकारणात आलाय. जनतेच्या पाठिंब्याने तुम्ही इथं पर्यंत पोहोचला आहात. त्यांच्या सुखदुखाच्या वेळी तुम्ही तिथे हजर राहिले पाहिजे .