उदयनराजे यांच्या उमेदवारीला कोणाचाही आक्षेप नाही, पवारांची सारवासारव

मुंबई – उदयनराजे यांच्या उमेदवारीला कोणाचाही आक्षेप नाही. याबाबत सातारा जिल्हाध्यक्ष आणि संबंधित पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, असे स्पष्टीकरण देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सध्या सुरु असलेल्या वादावर भाष्य केल आहे.

शरद पवारांच्या बारामती येथील गोविंदबाग या निवासस्थानी आमदारांनी खासदार उदयनराजे यांच्या उमेदवारीला विरोध केला, अशा बातम्या पसरताच एकच खळबळ उडाली होती. मात्र आता पवारांनी स्वतः हे स्पष्टीकरण दिल्याने या वादावर तूर्तास तरी पडदा पडेल अशी चिन्हे आहेत.