प्रतिभाताईंचे ते ‘पद’ मी हिरावले – शरद पवार

sharad pawar and pratibha patil

पुणे: माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी अनेक पदांवर कामे केली आहेत. मात्र मुख्यमंत्री पदावर काम करण्याचे त्याचं राहून गेल, कारण त्यांच्यापासून हे पद हिरावून घेण्याचे काम मी केल असल्याची खंत माजी केंद्रीयमंत्री शरद पवार यांनी बोलून दाखवली आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या राजकीय कारकीर्दीस ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज त्यांच्या जीवनावर आधारित ‘भारताची प्रतिभा’ या जीवनगौरव ग्रंथाच प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आल. यावेळी ते बोलत होते.

शरद पवार हे भावी राष्ट्रपती – सुशीलकुमार शिंदें

माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते जरी प्रतिभा पाटील यांचा सत्कार होवू शकला नसला, तरी व्यासपीठावर उपस्थित भावी राष्ट्रपती शरद पवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार होत आहे, म्हणत माजी केंद्रीयमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी पवार हे भावी राष्ट्रपती असल्याच भाकीत केल आहे. दरम्यान हा माझा मार्ग नाही सांगत शरद पवार यांनी भावी राष्ट्रपतीच्या चर्चेला उत्तर दिले आहे.