महाराष्ट्राच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या ‘या’ प्रलंबित प्रश्नासाठी शरद पवार घेणार वकील हरिष साळवे यांची भेट

sharad-pawar

टीम महाराष्ट्र देशा- महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाची सुनावणी येत्या महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्राची बाजू मांडणारे वकील हरिष साळवे यांच्याशी लवकरच चर्चा करणार असल्याची माहिती खा. शरद पवार यांनी दिली.खटल्याच्या कामाबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संबंधित अधिकारी यांच्यासोबत देखील चर्चा करण्याचे आश्वासन पवार यांनी दिले.

मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी सीमाप्रश्नाच्या खटल्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी 1 ऑक्टोबर रोजी अहमदनगर येथे पवार यांची भेट घेतली. त्यावेळी पवार म्हणाले, सरन्यायाधीश दीपक मिश्रा हे निवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागी नवे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची नियुक्ती झाली आहे. त्यानंतर खटल्याच्या सुनावणीला वेग येण्याची शक्यता आहे. यामुळे सीमाप्रश्नी महाराष्ट्राने नेमलेल्या वकिलांची बैठक आयोजित करून योग्य त्या सूचना करेन. अनेक दिवसांपासून न्यायालयात सीमाखटल्याची सुनावणी झालेली नाही. यामुळे सीमाभागातील मराठी बांधवांमध्ये काही प्रमाणात निराशा पसरली आहे. ही निराशा दूर करण्यासाठी सुनावणी लवकर सुरू होण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

कॉंग्रेस-राष्ट्रवादीचं ठरलं ! विखे पाटलांच्या घरी झालेल्या बैठकीत आघाडी निश्चित

आधी पक्षातली कुरघोडी थांबवा,मग आम्हाला टक्कर द्या;पंकजा मुंडेचा पवारांना खोचक सल्ला