कोरेगाव-भीमा हिंसाचार : कोणत्याही संघटनेला जबाबदार ठरवण्याच्या परिस्थितीत नाही, पवारांची कोलांटी उडी

पुणे : राज्यभरात खळबळ माजविणाऱ्या कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार चौकशी आयोगासमोर जे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. हिंसाचार झाल्यानंतर शरद पवार यांनी हिंसाचारानंतर केलेल्या वक्तव्यात यामागे पुण्यातील काही हिंदू संघटनांची महत्त्वाची भूमिका असल्याचा दावा केला होता.मात्र आता आपण कोणत्याही एखाद्या विशिष्ट संस्थेवर आरोप करण्याचा परिस्थितीत नाही अशी माहिती त्यांनी दिली आहे.

कोरेगाव भीमा हिसांचाराचा तपास करण्यासाठी चौकशी आयोग गठीत करण्यात आला असून यामध्ये दोघांचा समावेश आहे. कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जे एन पटेल आणि माजी राज्य सचिव सुमित मुलिक यांचा चौकशी आयोगात समावेश आहे. त्यांनी सर्व राजकीय पक्षांना पत्र लिहिलं असून हिंसाचारासंबंधी त्यांच्याकडे असणारी माहिती प्रतिज्ञातपत्राद्वारे सादर करण्याचं आवाहन केलं होतं.

चौकशी आयोगासमोर जे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे त्यात नेमकं काय म्हटलं आहे शरद पवार यांनी ?

आता आपण कोणत्याही एखाद्या विशिष्ट संस्थेवर आरोप करण्याचा परिस्थितीत नाही. कोरेगाव भीमा आणि आसपासच्या परिसरातील सामान्य व्यक्तीची सुरक्षा करण्यात राज्य सरकार आणि सुरक्षा यंत्रणा अपयशी ठरलं हे फार दुर्दैवी आहे. सुरक्षा यंत्रणाच ठोस पुरावा मिळवू शकतात.कोरेगाव भीमामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात असामाजिक तत्वं असणं हे कायदा सुव्यवस्थेचं अपयश आहे. दुर्दैवाने हा हिंसाचार इतर जिल्ह्यांमध्येही पसरला. सामाजिकदृष्या संवेदनशील विषय हाताळण्यात सुरक्षा यंत्रणा किती अपयशी ठरली आहे हे यामधून दिसतंय. मला स्वत:ला वाटतं की पोलिसांनी हिंसाचार रोखण्यासाठी जी काही पावलं उचलली ती पुरेशी नव्हती.

You might also like
Comments
Loading...