लोकांच्या मनात मी अजूनही राज्यकर्ता – शरद पवार

चंद्रपूर: चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेले शरद पवार राज्यातील जनतेच्या मनावर अजूनही अधिराज्य गाजवत आहेत. आता सत्तेत जरी नसले तरी लोकांचा विश्वास मात्र शरद पवारांवर आहेच, हे आम्ही नाही तर दस्तुरखुद्द शरद पवार हेच म्हणाले आहेत.

शरद पवार म्हणाले, ”राज्यात कुठेही फिरत असताना प्रकर्षाने जाणवणारी बाब म्हणजे मी अजुनही राज्यकर्ता आहे, अशी भावना लोकांमध्ये जाणवते, राज्यात मी जिथं कुठे जातो, तिथं अजूनही लोक माझ्याकडे समस्या सोडवण्यासाठी घेऊन येतात, त्यांच्या मागण्यांची निवेदनं देतात. यावरून राज्यातलं फडणवीस सरकार अजूनही आपल्या कामाचा ठसा उमटू शकलेलं नाही, हेच सूचित होतंय.” ते चंद्रपूर मध्ये बोलत होते.

You might also like
Comments
Loading...