‘मी छोट्या लोकांच्या आव्हानाकडे लक्ष देत नाही’

टीम महाराष्ट्र देशा- दुष्काळावरील उपाययोजनांबाबत काँग्रेस अध्यक्ष शरद पवार किंवा त्यांच्या पंटरने चर्चेला यावं, असं आव्हान महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांना केलं होतं. यावर पवारांनी पलटवार केला आहे.मी छोट्या लोकांच्या आव्हानाकडे लक्ष देत नाही, मुंबईत बसून व्याख्याने देण्यापेक्षा त्या लोकांनी इथे येऊन पाहणी करावी, असं म्हणत शरद पवारांनी निशाणा साधला आहे.

शरद पवार सातारा येथे दुष्काळ दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी दुष्काळाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फोनवरून दुष्काळाची माहिती घेत असल्याची बातमी आपण वाचली. फोनवरून कोणीही माहिती घेवू शकते, मात्र सरकारने राज्यभरात फिरून परिस्थिती समजून घ्यायला हवी, अशी भूमिका राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी मांडली आहे.