वाचा नगर जिल्हा भाजपकडे का गेला? या प्रश्नाचे पवारांनी दिलेले उत्तर

नगर : अहमदनगर मध्ये भाजपचे चांगलेच प्रस्थ वाढलेलं पहायला मिळत आहे. मात्र नगर जिल्हा भाजपच्या ताब्यात का गेला याचं उत्तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलं आहे. अहमदनगर जिल्ह्य़ात काँग्रेस व राष्ट्रवादी एक विचारांनी राहिली नाही, जिल्ह्य़ात भाजप लोकांपर्यंत पोहचलेला नाही तर आपणच कमी पडलो आहोत, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी दोन्ही काँग्रेसला लगावला आहे.तसेच राज्याच्या प्रमुखालाच राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य नसल्याचे परिणाम सर्वसामान्यांना भोगावे लागणार असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी आज केली.

काल सायंकाळी शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये आयोजित केलेल्या पक्षकार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पक्षाचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, आ. दिलीप वळसे, आ. संग्राम जगताप, आ. अरुण जगताप, आ. वैभव पिचड, आ. राहुल जगताप, युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आदी उपस्थित होते.

नेमकं काय म्हणाले शरद पवार ?
नगर जिल्हा कधीच भाजपचा म्हणून ओळखला जात नव्हता, हा जिल्हा पूर्वी प्रागतिक व डाव्या विचारांचा म्हणून ओळखला जायचा, नंतर काँग्रेस व आपला होता, परंतु जिल्ह्य़ाचे हे चित्र आता बदलले आहे, भाजपला ५ जागा मिळाल्या. याचा अर्थ भाजपचा विचार लोकांनी स्वीकारला आहे, असे नाही तरअहमदनगर जिल्ह्य़ात काँग्रेस व राष्ट्रवादी एक विचारांनी राहिली नाही, जिल्ह्य़ात भाजप लोकांपर्यंत पोहचलेला नाही तर आपणच कमी पडलो आहोत.

आगामी विधानसभेसाठी शरद पवार यांचा ‘हा’ आहे मास्टर प्लान