आपण प्रतिभासंपन्न कवी, आदर्श माणूस आणि सर्वोत्तम सांसद गमावला : शरद पवार

sharad-pawar 1

पुणे : भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे, वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र, मागील 48 तासांत त्यांची प्रकृती जास्त खालावली होती.

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे आपण एक उमदं व्यक्तिमत्त्व, प्रभावी वक्ता, प्रतिभासंपन्न कवी, आदर्श माणूस आणि सर्वोत्तम सांसद गमावला आहे. संसदेत त्यांच्यासोबत अनेक वर्षे काम केल्यानंतर आज अटलजींच्या निधनाने माझेही वैयक्तिक नुकसान झाले आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो. वाजपेयीजींना भावपूर्ण श्रद्धांजली ! अश्या शब्दात माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी वाजपेयी यांना आदरांजली अर्पण केली आहे.

देशाच्या राजकारण एक मितभाषी आणि कणखर नेतृत्व म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांना ओळखलं जातं. कारगिलची लढाई असो की भारताला अणुअस्त्रधारी देश बनवण्याच्या निर्णय, त्यांनी आंतरराष्ट्रीय विरोध झुगारत देशहिताचे असंख्य निर्णय घेतले होते.

माजी पंतप्रधान, सहृद्यी राजकारणी, सर्वोत्तम संसदपटू भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे देशाच्या राजकीय आणि सामाजिक स्थित्यंतराचा चालता-बोलता विश्वकोष काळाच्या पडद्याआड गेला अश्या शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी वाजपेयी यांना आदरांजली अर्पण केली आहे.