पवार घराण्यातील सगळ्यांनी निवडणूक लढवली तर सामान्य कार्यकर्त्यांना कधी संधी मिळणार? :पवार

मुंबई : पार्थ पवार यांच्या उमेदवारीच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगू लागल्या आहेत मात्र पार्थ यांच्या उमेदवारीला त्यांचे आजोबा आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट विरोध केला आहे. पवार घराण्यातील सगळ्यांनी निवडणूक लढवली तर सामान्य कार्यकर्त्यांना कधी संधी मिळणार? असा सवाल शरद पवार यांनी विचारला आहे.

लोकसभा निवडणूक 2019 च्या तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत बैठक सुरु आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक होत आहे. या बैठकीत जिल्हानिहाय लोकसभा मतदारसंघातील जागांचा आढावा घेण्यात येत आहे.
यावेळी पार्थच्या उमेदवारीला शरद पवारांनी विरोध केल्याचं कळतंय.ज्या मतदारसंघात पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा आहे, त्या मावळ मतदारसंघातून लक्ष्मण जगताप यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक केली आहे.

एक नव्हे तर पवारांचे दोन नातू एकाच वेळी राजकारणात उतरण्याची शक्यता