fbpx

आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेने भाजपसोबत युती करू नये – शरद पवार

sharad-pawar 1

मुंबई : येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने भाजप सोबत युती न करता, वेगळी निवडणूक लढावी त्यांना त्याचा फायदा होईल असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे . ते एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

दरम्यान याच मुलाखतीत पुढे बोलताना ते म्हणाले की,कॉंग्रेससोबत आम्ही आघाडी करणारच आहोत.पण बसपा आमच्यासोबत आल्यास फायदा होईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निवडणूक चिन्ह हत्ती होतं .आता बसपाच निवडणूक चिन्ह देखील हत्ती आहे. त्यामुळे बहुजन समाजाला मायावती यांच्याबद्दल सहानभूती आहे. तसेच मायावती ह्या तळागाळातून वर आलेल्या नेत्या असल्याचं बहुजन समजला वाटत असल्याने त्यांच्या मताचा आम्हला फायदा होईल.

२०१९ पर्यंत कर्नाटकात भाजप सत्तेवर येईल – अमित शहा