ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या – शरद पवार

मुंबई : मराठा आरक्षणाबाबत शरद पवार यांच्या बदलत्या भूमिकाबाबत राजकीय वर्तुळात तर्क – वितर्कांना उधान आलं आहे.
मध्यंतरी राज ठाकरे यांना दिलेल्या मुलाखतीत आर्थिक निकषावर आरक्षण हवे, अशी भूमिका पवारांनी मांडली होती. तर परवा कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत एससी, एसटी आणि ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं असं पवार यांनी म्हंटलं आहे.

दरम्यान दुसरीकडे आरक्षणासाठी सध्या सुरू असलेल्या हिंसक आंदोलनामागे राजकीय पक्ष असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केलाय. तसेच पवारांनी चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलंय. त्यांनी महाराष्ट्राच्या प्रतीमेला काळीमा लागेल अशा घटना रोखण्यासाठी पुढाकार घ्यावा असंही राणेंनी म्हटलंय. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

पक्षात पदे मिळाल्यानंतर स्वत:चे आर्थिक फायदे साधण्याचे प्रकार घडतात : अजित पवार

मुख्यमंत्री बदलला तर त्याचा आम्हाला फायदाच; फडणवीसांच्या डोक्यावर पवारांचा हात