शरद पवारांनी सत्तेसाठी कधीच तडजोड केली नाही

sharad pawar

सांगली: आताचे सरकार सत्तेसाठी काहीही करू शकते. शरद पवारांनी मात्र सत्तेसाठी कधीच तडजोड केली नाही. असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हल्लाबोल यात्रेदरम्यान अजित पवार सांगली येथे बोलत होते.

Loading...

अजित पवार म्हणाले, शरद पवारांनी सत्तेसाठी कधी तडजोड केली नाही. सत्ता गेली तरी चालेल पण मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देईन अशी भूमिका पवार साहेबांनी नामांतर लढ्याच्या दरम्यान घेतली होती. आताचे सरकार सत्तेसाठी काहीही करू शकते.

हल्लाबोलयात्रेचा चौथा टप्पा पश्चिम महाराष्ट्रात सुरु असून राष्ट्रवादी कॉंग्रेसने सत्ताधारी भाजप-शिवसेनेवर प्रहार केला आहे. आगामी निवडणुकांसाठी विरोधकांनी मोर्चेबांधणीला जोरदार सुरवात केली असून राष्ट्रवादीने हल्लाबोल यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला.Loading…


Loading…

Loading...